बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत
या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे. हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून …